Navinya Prakashan
Swapnavidnyaan byt Jyotishacharya Dr Narendra Dharane
Swapnavidnyaan byt Jyotishacharya Dr Narendra Dharane
Couldn't load pickup availability
स्वप्नाविषयी मनुष्यप्राण्यास नेहमीच कुतूहल वाटत आले आहे. कुणाला ईश्वराची लीला पाहावीशी वाटते. तर कुणाला, त्यात होउन गेलेल्या घटनांची प्रतिबिंबे आढळतात. कुणाला स्वप्नभेद करून मनाच्या पलीकडे जाण्याची इच्छा असते.
स्वप्नांची दुनिया हा एक अजबखाना असून भविष्यसूचक स्वप्नांचे बाबत भारतीय व पाश्चिमात्य अशा दोन पद्धतीचे, ठोकताळे उपलब्ध होत असले तरी भारतीय ठोकताळ्यांचे, निष्कर्ष तुटपुंजे आहेत. त्यामुळे सामान्य जनतेची कुचंबणा होते. स्वप्ने व त्यांचे प्रकार कोणते ? स्वप्नांचे फळ लाभदायी अथवा नुकसानदायक ? कोणत्या वेळेचे स्वप्न फळ अनुभवास येतेय कोणती स्वप्ने साकार होतात? कोणती निष्फळ होतात ? स्वप्ने कशी व का पडतात? वगैरे विषय या पुस्तकात घेतले आहेत. स्वप्न हे मानसशास्त्रातील एक गूढ कोडे आहे. त्याचा उलगडा करण्याचा छोटासा प्रयत्न या पुस्तकात केलेला आहे.

