Navinya Prakashan
Swarbhogi Dr Vasantrao Deshpande by Dr Lata Nilkanth Deo
Swarbhogi Dr Vasantrao Deshpande by Dr Lata Nilkanth Deo
Couldn't load pickup availability
डॉ. वसंतराव देशपांडे हे प्रतिभावान चतुरस्त्र गायक, संगीत अभ्यासक उत्तम तबलिये असल्याने गाताना त्यांना सम विनासायास दिसायची, ते समेवर येण्याऐवजी सम त्यांच्याबरोबर यायची. त्यामुळे त्यांच्या गायनातील लयकारी त्यांच्या बुद्धिवैभवाचे दर्शन घडवायची. रागदारी तसेच इतर संगीत प्रकारात त्यांचे सूर, लय, अभ्यास, कल्पकता, रियाज याबरोबरच आलापी, बोलअंग, बोलतान, तान, सरगम अशा विविध गायन गुणांवर प्रभ असल्याने त्यांचे गायन रसिकांना मोहवून टाका संगीतविषयक त्यांचे अफाट वाचन असल्याने त्य अनुभव, विचार निष्कर्ष निश्चित होते. गायन ही कल 'प्रायोगिक कला' आहे याचा त्यांना कधी विसर पडल नाही. त्यामुळे त्यांच्या पोटातील ज्ञान बैठकीत गायनालह रंगतीने फुले, त्यावेळी त्यांच्या पांडित्याला लालित्याची सुंदर किनार लाभल्याचे प्रत्ययास येई आणि श्रोता हरखून जाई ! असा आदरणीय प्रतिभावान चतुरस्त्र गायक कलावंत आता होणे नाही.

