Navinya Prakashan
Uttarvahini Narmada Parikrama Ani Duttasthan by Onkar Vartale
Uttarvahini Narmada Parikrama Ani Duttasthan by Onkar Vartale
Couldn't load pickup availability
नर्मदे हर SS !!
उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा ही तशी दोन ते तीन दिवसांची परिक्रमा. अंतरही थोडेसेच; पण अतिशय पवित्र अशी ही परिक्रमा. चैत्र महिन्यातच अनेक भाविक ही परिक्रमा पूर्ण करतात. एक विलक्षण अनुभव पदरी पडत असतो अशी बऱ्याच जणांना प्रचिती आली आहे. गुजरात राज्यात केली जाणारी ही परिक्रमा अनेक भाविक पायी करतात, शिवाय याच्या जवळच असलेल्या काही दत्तस्थानांचेही दर्शन घेतात. या दत्तस्थानांमध्ये गरुडेश्वर, नारेश्वर, भालोद, अनसूया तीर्थ, कुबेर भंडारी ही एकदा तरी अनुभवावी अशीच आहेत. नर्मदेच्या तीरावरती असलेल्या या ठिकाणांचा महिमा प्रत्यक्ष डोळ्यांनी अनुभवावा असाच आहे. खूप भारावलेले वातावरण असते. या छोट्याशा परिक्रमेत ती अद्भुत चुणूक आपल्याला पाहायला मिळते. उत्तरवाहिनीचा हा सारा प्रवास आणि या दरम्यान भेटलेली माणसे, आश्रम, परिक्रमावासी, गावे, संस्कृती, नर्मदामैय्याचे पात्र हे सारे या पुस्तकात तुम्हाला अनुभवायला मिळेल.

